मैला उचलण्याच्या प्रथेतून मेहतरांची होणार मुक्तता

July 21, 2012 2:07 PM0 commentsViews: 5

आशिष जाधवसह सुनिल उंबरे, पंढरपूर

21 जुलैपंढरपुरात मेहतर समाजाला मैला उचलण्याच्या प्रथेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. यासंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी येत्या आठ दिवसात करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. आयबीएन लोकमतनं यावर सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला होता.

पंढरपुरातला हा मेहतर समाज…गेल्या 123 वर्षांपासून इथं मैला उचलण्याचं काम करतो. सुप्रीम कोर्टाने 1993 साली याला कायद्यानुसार गुन्हा ठरवलं, तरीदेखील या समाजाकडून हे काम करुन घेतलं जायचं. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी याला आयबीएन लोकमतने वाचा फोडली. पंढरपुरातली ही परिस्थिती महाराष्ट्रासमोर मांडली. हाच प्रश्न विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मांडला. त्यावर सरकारला या कायद्याच्या अंमलबजावणीचं आश्वासन द्यावं लागलं.विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर पंढरपुरात मेहतर समाजानं एकच जल्लोष केला. आयबीएन लोकमतने याचा पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. सरकारनं ही प्रथा बंद करण्याचं आश्वासन जरुर दिलंय. पण त्याची अंमलबजावणी किती तात्काळ आणि कडक केली जाते, हे मात्र पाहावं लागेल.

close