व्हीआयपीचं बजेट वाढलं पण एनएसजीच्या खर्चात कपात

December 17, 2008 4:54 PM0 commentsViews: 9

नवी दिल्ली, 17 डिसेंबर राहील खुर्शिददहशतवादाशी मुकाबला कसा करायचा, यावर सगळ्याच स्तरांवर चर्चा सुरू आहे. पण एकीकडे व्हीव्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेच्या खर्चात वाढ होतेय तर दुसरीकडे दहशतवादविरोधी पथकांच्या खर्चात मोठी कपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचे नुसतेच कागदी घोडे नाचवले जातात पण राजकीय नेत्यांना मात्र अतिखर्चाची कडक सुरक्षा पुरवण्यात येते. प्रामाणिक भारतीय करदात्यांनी भरलेल्या पैशातूनच 180 कोटी रुपये वापरून झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेवर खर्च केले जातात. त्यात पंतप्रधान, गांधी परिवार, विरोधी पक्षाचे नेते आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे. एकट्या दिल्ली शहरातच 60 हजारांपैकी निव्वळ 15 पोलीस 400 व्हीआयपींना सुरक्षा पुरवण्यात अडकले आहेत. त्यातही धक्कादायक म्हणजे दहशतवादी हल्ले वाढतायत, मात्र दहशतवादविरोधी पथकांच्या खर्चातच कमालीची कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी एनएसजी साठीचं बजेट 159 कोटी रुपये होतं, ते 2008- 2009 यावर्षी 158 कोटींवर आणण्यात आलयं. मात्र व्हीआयपींना विशेष सुरक्षा पुरवणार्‍या पथकाचं 2007- 2008 मध्ये 117 कोटी असलेलं बजेट, 2008-2009 मध्ये 180 कोटी रुपये करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार कमीतकमी 30 टक्के व्हीआयपींना सुरक्षेची अजिबात गरज नाही आणि 50 टक्के व्हीआयपींच्या सुरक्षाखर्चात कपात केली जाऊ शकते. गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी झेड सिक्युरीटी नाकारलीय. मात्र शिवराज पाटलांना अजून त्याची जाण नसल्याचचं दिसतय. दुसरीकडं डाव्या आघाडीचे नेते प्रकाश करात, सीताराम येच्युरी आणि ए.बी. बर्धन यांनीही सुरक्षा न घेता, स्वतःच्या वाहनेच प्रवास केलाय अगदी सत्तेत असतानासुद्धा, आतातरी इतर राजकारणी यावरून बोध घेतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

close