राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आणि वाद !

July 22, 2012 8:09 AM0 commentsViews: 23

अजय कौटिकवार, मुंबई

22 जुलै

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पाठिंब्यासाठी रंगलेली राजकीय नाट्य यामुळे यावेळची राष्ट्रपती निवडणूक लक्षवेधी ठरली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण करू नये, असे संकेत आहेत. पण 1977च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आत्तापर्यंत राष्ट्रपतीपदाची एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही. याच निवडणुकीनं देशाच्या राजकणाला कलाटणी दिली. सुरवातींच्या काही निवडणुकींचा अपवाद वगळता राष्ट्रपतीपदाच्या प्रत्येत निवडणुकीत दिसल्या राजकीय खेळी आणि डावपेच. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्याचा पहिला मान मिळाला डॉ. राजेंद्रप्रसाद यांना. दोन वेळा राष्ट्रपतीपदावर राहण्याची संधी मिळालेले ते ऐकमेव नेते. त्यानंतर राष्ट्रपतीपदावर आले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. राधाकृष्णन यांच्या विद्वत्ता आणि व्यासंगानं जगभरातल्या नेत्यांना प्रभावित केलं. या काळात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींमध्ये किरकोळ मतभेद वगळता फारसे वादाचे प्रसंग आले नाहीत.

1964 मध्ये पंडित नेहरूंच्यां निधनानं एका युगाचा अस्त झाला. त्यानंतर इंदिरा गांधींचं नेतृत्व झपाट्यानं पुढं आलं आणि राजकारणही बदलत गेलं.

यानंतर राष्ट्रपती झाले. डॉक्टर झाकीर हुसेन.. पण दोनच वर्षात त्यांचं निधन झाल्यानं पुन्हा निवडणूक घ्यावी लागली. 1977 मध्ये झालेल्या याच निवडणुकीनं देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. इंदिरा गांधींच्या राजकराणातल्या दादागीराची ओळखही याच निवडणुकीतून देशाला झाली. त्यावेळी काँग्रेसमध्ये 'सिंडीकेट' आणि 'इंडिकेट' असं शीतयुध्द सुरू होतं. काँग्रेसनं राष्ट्रपतीपदासाठी नीलम संजीव रेड्डींची उमेदवारी जाहीर केली. या निवडीला इंदिरा गांधींचा विरोध होता. पण त्यांनी तो स्पष्टपणे जाहीर न करता उपराष्ट्रपती व्ही.व्ही.गीरी यांना उमेदवारी दिली आणि 'सद्सदविवेक बुध्दीला' स्मरून मतदान करण्याचं आवाहन केलं. या निवडणुकीत गिरी विजयी झाले. पंतप्रधानांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केल्याचं राजकारण सर्व जगानं बघितलं. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि इंदिरा गांधींचं एकछत्री साम्राज्य प्रस्थापित झालं.

त्यानंतर ग्यानी झैलसिंग, आर.व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा, के.आर. नारायणन, एपीजे अब्दुल कलाम यांनी हे पद भूषवलं. यात शास्त्रज्ञ असलेल्या कलामांची कारकीर्द लक्षवेधी ठरली. तर प्रतिभाताई पाटील यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला.

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत. मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी अशी ओळख असलेल्या प्रणव मुखजीर्ंची निवड निश्चित मानली जातेय. आघाडीचं राजकारण असलेल्या सध्याच्या काळात यापुढं देशाचं लक्षं आता राष्ट्रपती भवनाकडे लागणार आहे.

close