बॉलिवूडकरांची ‘सुपरस्टार’ला श्रद्धांजली

July 21, 2012 2:38 PM0 commentsViews: 10

21 जुलै

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतल्या ताज लॅन्ड्स एन्ड हॉटेलमध्ये त्यांच्या कुटुंबियांसमवेत अख्ख बॉलिवूड उपस्थित आहे. अंजू महेंद्रू, अमिताभ बच्चन,जया बच्चन, शशी कपूर, ह्रषि कपूर,राकेश रोशन,अमीर खान, किरण राव,दिपिका पदुकोण, रणबीर कपूर,मिथुन दा अशी अनेक बॉलिवूडची मंडळी राजेश खन्ना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर आहेत. बुधवारी राजेश खन्ना यांना साश्रू नयनाने निरोप देण्यात आला. यावेळी समस्त बॉलिवूडसह हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या सुपरस्टारचे अंतदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाले नाही. सलग 15 सुपरहिट सिनेमे देण्याचा रेकॉर्ड राजेश खन्ना यांच्या नावावर आहे.

close