राज्यभरात ‘मनसे’ टोल बंद

July 24, 2012 4:44 PM0 commentsViews: 6

24 जुलै

टोल वसुलीत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत जनतेनं टोल देणं बंद करा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करत टोलनाक्यावर एकच हल्लाबोल केला. मुंबई,नवीमुंबई,पुणे,नाशिक,नागपूर,औरंगाबाद येथील टोल नाके बंद पाडली. टोलवर कोणतीही गाडी न अडवता टोल नाक्यावरून बाहेर पडली. वाहनधारकांनीही आंदोलनाचे स्वागत करत टोलनाक्यावरून सुसाट निघाले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना यापुढे टोल भरू नका अशी विनंतीही केली.

दुपारी राज यांच्या आश्वासनानंतर ठाण्यात आनंदनगर टोल नाक्यावर कार्यकर्ते धडकले. टोल देवू नका असं आवाहन त्यांनी वाहनचालकांना केलं. तर नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोलवसुली थांबवली. जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आलं. शिक्षणाचे माहेर घरं पुण्यातील टोकनाक्यावर आंदोलन करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका बंद केला. टोल वसुली करून ठेकेदार प्रवाशांची लूट करताहेत ही लूट थांबली पाहिजे अशी मागणी करत मनसेनं इथं आंदोलन केलं.तर तिकडे नागपुरातही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आणि टोल न भरतात गाड्या सोडून दिल्या. मात्र काही ठिकाणी कार्यकर्ते टोलनाक्यावरुन मागे फिरताच टोलवसुली झाली. मनसेच्या या आंदोलनाचं स्वागत वाहनचालकांनी उत्सूर्तपणे केलंय. पण सत्ताधारी राष्ट्रवादीला मात्र जनतेला टोलवसुलीचा हिशेब देण्याची गरज वाटत नाही. मंगळवारी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात पुन्हा टोल वसुली सुरू झाली. आधीच राजकीय संकटात सापडलेलं राज्य सरकार आता या कायदेभंग आंदोलनाविरोधात कडक पाउलं उचलणार का, हे पाहावं लागेल.

close