आनंदी आणि तंदुरुस्त भारतीय म्हणून सचिनची निवड

December 17, 2008 5:22 PM0 commentsViews: 11

17 डिसेंबर मुंबईशतकांचा शहनशहा. मास्टर ब्लास्टर.अशी अनेक विशेषण सचिन तेंडुलकरसाठी आजवर वापरण्यात आलीत. आणि यात आता अजून एका विशेषणाची भर पडणार आहे. भारतातील जनतेनं सचिनची सगळ्यात आनंदी आणि तंदुरुस्त भारतीय म्हणून निवड केली आहे. भारतातील सर्वाधिक आनंदी आणि तंदुरुस्त व्यक्तीचा शोध घेण्यासाठी कमप्लीट वेलबिइग या मासिकानं देशभरात सर्व्हे घेतला होता विविध क्षेत्रातील तब्बल 320 जणांची नामांकनं यासाठी करण्यात आली होती. त्यात या सगळ्यात आनंदी आणि तंदुरुस्त अशा दोन्हींसाठी सचिनची निवड करण्यात आली आहे. बॉलिवूडचा बादशहा शहारुख खान, अँग्री यंग मॅनअमिताभ बच्चन आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलामही सचिनसोबत या सन्मानासाठी शर्यतीत होते.आपल्या या निवडीवर सचिनही खूशआहे.भारतवासियांना जर असं वाटत असेल तर हा मी माझा बहुमान समजतो अशी प्रतिक्रिया सचिननं व्यक्त केली आहे.

close