माझ्यासाठी गौरवशाली क्षण – बिग बी

July 26, 2012 3:14 PM0 commentsViews: 4

26 जुलै

लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशांपासून दूर अंतरावर असलेल्या देशातील एखाद्या व्यक्तीला दिलेला हा सन्मान खूप मोठा आहे. एक भारतीय म्हणून मला याचा अभिमान आहे. आपले भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहे त्यांना खूप यश मिळावे अशी मी पार्थना करतो अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली. आज ऑलिम्पिकमध्ये टॉर्च रिलेमध्ये बिग बी सहभागी झाले होते त्यांच्याशी बातचित केली होती आयबीएन-सेवनचे स्पोर्ट्स एडिटर अभिषेक दुबे यांनी..

close