देवाच्या दारी यमदुताच्या तावडीतून सुटका

July 27, 2012 12:02 PM0 commentsViews: 21

27 जुलै

गोंदियामध्ये काल गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदीकाठी असलेल्या पिडकेपर परिसरातील काली मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढल होतं. पुजारी मंदिरात झोपल्यामुळे तो पुराच्या पाण्यात अडकला. जिव वाचवण्यासाठी पुजारी मंदिराच्यावर तब्बल 12 तास चढून राहीला. दरम्यान, पाण्याची पातळी वाढतचं चालली होती, नगरसेवक राजू कुथे यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला फोन केला.म् ाात्र कोणताही कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हता, शेवटी कुथे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क केला, अखेर तीन तासानंतर आपत्ती विभागाचे कर्मचारी दाखल झालेत आणि बोटीच्या माध्यमातून अडकलेल्या पुजार्‍याची तब्बल 12 तासांनतर सुटका झाली.

close