काही दलित नेते खेकडा वृत्ती सोडेना – शरद पवार

July 28, 2012 3:10 PM0 commentsViews: 21

28 जुलै

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा असा मंत्र दलित जनतेला दिला पण आंबेडकरी नेते मात्र आपली खेकडा वृत्ती काही सोडत नाही. एकमेकांच्या पायात पाय घालून दलित चळवळ संपवण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांचे नाव घेता केली. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या दलित बहुजन चेतना परिषदेच्या उद्घाटनच्या वेळी शरद पवार बोलत होते.

close