अण्णा उतरणार राजकारणाच्या आखाड्यात

July 27, 2012 4:31 PM0 commentsViews: 3

27 जुलै

जनतेला उपोषणाला दुसरा पर्याय देणं आवश्यक आहे. जनतेची जर राजकीय पक्षाची मागणी असेल तर ती आम्हाला स्विकारावी लागेल असे स्पष्ट संकेत अण्णा हजारे यांनी दिले आहे. तसेच उमेदवार देण्याबाबतही टीम अण्णा विचार करत असल्याची माहिती अण्णांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. या मुलाखतीत अण्णांना राजकीय पार्टी काढण्याचे संकेत दिले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकी अगोदर अण्णा देश भराचा दौरा करणार आहे. आणि लोकांना काँग्रेस,भाजप इतर पक्ष कसे आहेत हे सांगणार आणि मग त्यांना लोकप्रतिनिधीचा पर्याय देणार ज्यामुळे जनता आपला प्रतिनिधी ठरवू शकेल. लोकपाल विधेयक ही अण्णांची मागणी नाही. तर देशासाच्या हितासाठी आम्ही मागणी करत आहोत. मला आजही आशा आहे की सरकारच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल आणि लोकपाल आणतील अशी आशाही अण्णांनी व्यक्त केली.

close