सरकार चालवण्याची चिंता काँग्रेसने करावी – पवार

July 28, 2012 3:57 PM0 commentsViews: 2

28 जुलै

नाराजीनाट्यानंतर शरद पवार यांनी मौन सोडलंय. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष हे लोकांमधून निवडून आले आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना टोला हाणलाय. त्याचबरोबर राज्यातीलं सरकार हे आघाडीचे सरकार आहे. यात कोणतेही निर्णय एकतर्फी होऊ नयेत, निर्णय दोन्ही पक्षांचे नेते बसून घेतील असंही पवारांनी बजावून सांगितलं. इतकचं नाही तर सरकार कसं चालवावं याची चिंता राष्ट्रवादीला नाही पण ती चिंता काँग्रेसला आहे असं म्हणत पवरांनी काँग्रेसला टोला लगावला. तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचा अप्रत्यक्षपणे आक्षेपही पवारांनी व्यक्त केला आहे.

close