मोहतेशाम अलीने केलं लालूंना खूश

December 17, 2008 2:41 PM0 commentsViews:

17 डिसेंबर दिल्लीमिस्टर वर्ल्ड स्पर्धेत दुसरा आलेला मोहतेशाम अली नवी दिल्लीत लालूंना भेटायला गेला. सदिच्छा भेटीसाठी गेलेल्या मिस्टर वर्ल्डला लालूंनी त्यांच्या ऑफिसमध्येच सगळ्यांच्या देखत प्रात्यक्षिकं सादर करण्यासाठी फर्मावलं. लाजत लाजत मोहतेशामने आधी शर्ट उतरवला. पण तेवढ्याने लालूंचं समाधान झालं नाही.त्यांनी मोहतेशामला खूण केली.अखेर मोहतेशाम तयार होऊन आला आणि पँटही उतरवून आखाड्यातल्या वेशात त्याने काही पोझेस खास लालू आणि त्यांच्या कार्यालयातल्या कर्मचा-यासमोर दाखवल्या. लालूंना कुस्तीचं आकर्षण आहे.आणि आखाड्यात ते नियमित कुस्ती पहायला जातात.मोहतेशमाचंही त्यांनी कौतुक केलं. आणि रेल्वेत नोकरी करणा-या या हुशार बॉडीबिल्डरला त्यांनी पाच लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं. त्याशिवाय निरिक्षक पदी बढतीही दिली.

close