अण्णांनी मागितली मीडियाची माफी

July 31, 2012 2:17 PM0 commentsViews: 3

31 जुलै

टीम अण्णांनी मीडियाची माफी मागितली आहे. काल काही अण्णासमर्थकांकडून मीडियावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशनने या घटनेसंदर्भात टीम अण्णांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज स्वत: अण्णा हजारेंनी मीडियाची माफी मागितली. एवढचं नव्हे तर त्यांनी हुज्जत घालणार्‍या समर्थकांना चांगलाच दम दिला. आंदोलनादरम्यान हिंसा झाली तर उपोषण मागे घेऊ असा सज्जड दमही त्यांनी आंदोलकांना दिला.

close