‘जय सोनिया, जय बाळासाहेब !’

July 31, 2012 3:18 PM0 commentsViews: 10

31 जुलै

विधानपरीषदेवर बिनविरोध निवड झालेल्या 11 आमदारांनी आज आमदारकीची शपथ घेतली. विधानपरीषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्यांना शपथ दिली. पण यावेळी शपथ घेतना 'ज्याचा त्याचा विठ्ठल' असा प्रकार घडला. या वेळी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी शपथ घेतल्यानंतर जय सोनीया गांधी असा पुकारा केला तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शपथ घेतली. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शरद रणपीसे, संजय दत्त तर राष्ट्रवादीच्या वतीने जयदेव गायकवाड, अमरसींंग पंडीत, नरेन्द्र पाटिल आणि भाजपच्या आशिष शेलार, भाई गिरकर तर शिवसेनेकडून विनायक राऊत, अनील परब तर शेकापच्या जयंत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली. तुडुंब भरलेल्या विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ सोहळा पार पडला.

close