गांगुली पुन्हा मैदानात उतरणार

December 17, 2008 5:51 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर कोलकातासौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. होय विश्वास बसत नाही ना.पण हे खरं आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड होऊन त्याला जेमतेम एकच महिना झाला.आणि तरीही तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे .स्पर्धात्मक क्रिकेटमधील ही आपली शेवटची मॅच असेल असं गांगुलीनं जाहीर केलं आहे.भारताचा हा माजी कॅप्टन त्याच्या बंगाल टीमकडून रणजी ट्रॉफीत खेळणार आहे. गुरुवारी दिल्लीत होणा-या सेमी फायनलमध्ये तो गोवा टिमविरुद्ध मॅच खेळेल. जर या मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवला तर पुढच्या वर्षी होणा-या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये त्यांना थेट प्रवेश मिळेल. त्यामुळे त्याची ही कदाचित शेवटची मॅच असेल. बंगाल टिममधले बरेच खेळाडू आयसीएलमध्ये गेल्यानं त्यांना मुख्य खेळाडूंची कमतरता भासत आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोशिएशन तसंच त्याच्या सहका-यांनी विनंती केल्यामुळे गांगुलीने पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला.

close