पंजाबविरुद्धच्या रणजी मॅचसाठी मुंबईची टीम सज्ज

December 17, 2008 6:56 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर मुंबईरणजी क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या लढतींना गुरूवारपासून सुरुवात होत आहे. अ गटात मुंबईची शेवटची मॅच पंजाबविरुध्द ब्रेबॉन स्टेडियमवर होणार आहे.पंजाबविरुद्धच्या या मॅचसाठी मुंबई टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत.अभिषेक नायर, राजेश वर्मा आणि रमेश पोवार यांचा विल्किन मोटा, ओमकार खानविलकर आणि विनायक माने यांच्याएवेजी मुंबईच्या टीममध्ये समावेश करण्यात आलं आहे. मुंबईने पॉइट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावत नॉक ऑऊट फेरीत आपला प्रवेश आधीच निश्चीत केला आहे. मुंबईच्या खात्यात आत्तापर्यंत 26 पॉइट्स जमा झाले आहेत. एकूण 6 मॅचमध्ये 4 विजय मिळवत मुंबईने स्पर्धेत आपलं वर्चस्व गाजवलंय. त्याखालोखाल गुजरातने 6 मॅचेसमध्ये 3 विजय मिळवत 23 पॉइट्सची कमाई केली आहे. सौराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबने प्रत्येकी 2 मॅचेस जिंकल्या आहेत. या पॉइट्स टेबलमध्ये राजस्थान 2 पॉइट्ससह शेवटच्या स्थानावर आहे.

close