टीम अण्णांची पक्ष स्थापनेची घोषणा

August 3, 2012 5:31 PM0 commentsViews: 10

03 ऑगस्ट

तब्बल दहा दिवसांनंतर टीम अण्णांच्या सदस्यांनी उपोषण सोडलंय आणि राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. स्वत: निवडणूक लढवणार नाही, पण टीमच्या पक्षाला पाठिंबा देऊ असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. या नव्या पक्षाचं नाव लोकांनी सुचवावं, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलंय. या नव्या पक्षाचे उमेदवार लोक निवडतील, पार्टी हायकमांड नाही असंही केजरीवाल यांनी म्हटलंय. आता संपूर्ण क्रांतीची वेळ आली आहे. लोकपालचा लढा आता अधिक मोठा झाल्याय आणि आंदोलन पुढच्या टप्प्यात पोचल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी आज अण्णांच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली. त्यांच्या हातून नारळपाणी घेऊन अण्णांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उपोषण सोडलं.

close