मालेगाव तपासाकडे दुर्लक्ष करू नका- आझमी

December 17, 2008 4:14 PM0 commentsViews:

17 डिसेंबर मुंबईमुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचं राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस शांत असलेले राजकीय नेते आता या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुढे सरसावलेत. समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांनीही एका पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. मात्र मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्लाही सरकारला दिला. अतिरेकी हे कोणत्याही धर्माचे नसतात असं सांगत त्यांनी बजरंग दलासारख्या संघटनांवरही बंदी घालण्याची मागणी केली.

close