विलासरावांचं जाणं हा मोठा आघात – शरद पवार

August 14, 2012 1:53 PM0 commentsViews: 27

14 ऑगस्ट

गेली 30 वर्ष त्यांनी माझ्यासोबत कामं केली. उत्तम प्रशासक, संघटना करण्याची भूमिका या सगळ्यांचा मिलाप म्हणजे विलासराव देशमुख.. त्यांची कारकिर्द खूप मोठी होती. विविध क्षेत्रात त्यांनी कामं केली. राष्ट्रीय मंचावर खुल्या मनाने काम करण्यासाठी त्यांनी अलीकडेच पर्दापण केलं होतं. पण दुर्देवाने प्रकृतीने साथ दिली नाही. विलासराव यांच्या जाण्यामुळे आम्ही एका उत्तम सहकार्‍यांला मुकलेलो आहोत. त्यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या सहकार्‍यांवर मोठा आघात आहे. तो आघात सहन करण्याची शक्ती मिळावी एवढीच प्रार्थना करतो.

close