फहीमसह सबाउद्दीनला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

December 18, 2008 8:15 AM0 commentsViews: 2

18 डिसेंबर, मुंबई मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन या लष्कर-ए-तोयबाच्या संशयित अतिरेक्याला मुंबई पोलिसांनी किल्ला कोर्टात आज हजर केलं. दोघांना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. फहीम अन्सारीला रामपूरमधील सीआरपीएफ कॅम्पवरच्या हल्ल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. या दोघांचा मुंबई हल्ल्याशी संबंध असल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांनी या दोघांना उत्तरप्रदेशातून मुंबईत आणलं. फहीमला रामपूरमधून तर सबाउद्दीनला लखनौमधून ताब्यात घेण्यात आलंय. सध्या या दोघांना क्राईम ब्राँचच्या जेलमध्ये ठेवण्यात आलंय. अन्सारीजवळ मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांचे नकाशे सापडले होते. सबाउद्दीननं फहीमला त्याच्या अतिरेकी कारवायांमध्ये मोठी मदत केली होती.

close