‘पुणे 52′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

August 18, 2012 11:53 AM0 commentsViews: 45

18 ऑगस्ट

इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि अरभाट या मराठी चित्रपट सृष्टीतील दोन नामवंत संस्था लवकरच 'पुणे 52' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या 12 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार अशी घोषणा इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सचे संचालक श्रीरंग गोडबोल अभिनेते गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक निखिल महाजन यांनी पुण्यात केली. एका गुप्तहेराच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. 1992 मधल्या एका घटनेवर हा सिनेमा आहे. गिरीश कुलकर्णी यांना या अगोदर देऊळ,मसाला या सिनेमातून वेगळ्या भुमिकेत पाह्याला मिळाले. या सिनेमाच्या माध्यमातून एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

close