राज यांना फूल देऊन पोलीस हवालदाराने मानले आभार

August 21, 2012 1:06 PM0 commentsViews: 21

21 ऑगस्ट

राज ठाकरेंच्या सभेला पोलीस दलातल्या अनेकांचा मनोमन पाठिंबा होता. राज ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर प्रमोद तावडे या पोलीस शिपायाने राज ठाकरेंना फूल दिलं. महाराष्ट्र पोलिसांची यूनियन नाही. पण राज ठाकरे आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे त्यांना फूल दिल्याचं प्रमोद तावडेंनी सांगितलंय. तावडे यांना ऑगस्ट 2010 साली सीआयएसएफ (CISF)च्या काही जवानांनी बेदम मारहाण केली होती. पण या प्रकरणात त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. राज ठाकरेंना फूल दिल्यानंतर आपल्यावर कारवाई होईल, याची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचंही तावडेंनी म्हटलं आहे.

close