मनसे – आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

August 23, 2012 4:18 PM0 commentsViews: 68

23 ऑगस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंदू मिलसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आज आरपीआयच्या विद्यार्थी शाखेनं राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजया निवासस्थानासमोर निदर्शनं केली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि आरपीआयचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यांच्यात बाचाबाचीही झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीतर आंदोलकांना मारहाणही केली. या आंदोलनात युवतींचा मोठा सहभाग होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यांचेही भान न बाळगता आंदोलकांवर हल्लाबोल केला. यावेळी उपस्थित पोलिसांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेतली. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यात,बुलढाण्यात निदर्शनं

पुण्यातही आज रिपब्लिकन सेना आणि भीम छावा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर रिपब्लिकन सेना आणि भिम छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे याच्या विरोधात घोषणा बाजी करून निषेध केला. राज ठाकरंेनी आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अशी प्रमुख मागणी यावेळी रिपब्लीकन सेना आणि भिम छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच बुलडाण्यातही रिपाई कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा निषेध केला. रिपाई कार्यकर्त्यांनी खामगाव इथे राज ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला गेला.

close