महागाई दरात मोठी घट

December 18, 2008 7:56 AM0 commentsViews: 32

18 डिसेंबरयावेळीही महागाई दराची आकडेवारी कमी होताना दिसलीय. महागाई दर नुकताच जाहीर झाला आहे. आणि सहा डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात दर 6. 84 टक्के झालाय. गेल्या 29 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात महागाई दर आठ टक्के होता. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर घसरण होताना दिसल्यामुळे महागाई दरामध्ये घट होताना दिसतेय. महागाई कमी होऊन पुढील वर्षी मार्चपर्यंत महागाई दर 5 टक्क्यांपर्यंत उतरतील असं आश्वासन सरकारनंही दिलं आहे.

close