हज़ारो जवाबो से अच्छी है मेरी खामोशी – पंतप्रधान

August 27, 2012 1:58 PM0 commentsViews: 3

28 ऑगस्ट

' हज़ारो जवाबो से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी' असं सांगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्यावर न बोलण्याचा आरोप करणार्‍यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आज पंतप्रधानांनी कोळसा खाण वाटपावर संसदेत निवदेन देत असताना विरोधकांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे पंतप्रधानांना बोलता आले नाही. पंतप्रधानांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद सांधला. कोळसा खाण वाटपाबद्दल मी पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण माझं मौन म्हणजे माझा कमकुवतपणा नव्हे, तर हीच माझी प्रतिक्रिया आहे. कोळसा खाण वाटपाचा कॅगचा रिपोर्ट वादग्रस्त आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी पंतप्रधानांनी केली.

close