हिंसाचाराप्रकरणी शरद पवारांकडून आबांना क्लीन चीट

August 29, 2012 10:21 AM0 commentsViews: 3

29 ऑगस्ट

मुंबईत सीएसटी परिसरात हिंसाचार झाला त्यावेळची परिस्थिती गृहखात्यांने नीट सांभाळली आहे. आर.आर.पाटील एक कर्तबगारमंत्री आहे त्यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी चुकीची आहे आमचा पक्ष सदैव आबांच्या पाठीशी आहे असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर.आर.पाटील यांनी क्लीन चीट दिली आहे. पवारांच्या क्लीन चीट दिल्यानंतर आबांनी आयबीएन लोकमतशी बोलताना समाधान व्यक्त केलं. शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असंही आबा म्हणाले.

close