नदीपार करण्यासाठी जीवघेणी कसरत

September 1, 2012 12:36 PM0 commentsViews: 8

01 सप्टेंबर

यवतमाळ जिल्हातील 1 हजार लोकसंख्येच्या चिखलगवान गावकर्‍यांना नदी पार करण्यासाठी दररोज कसरत करावी लागते. गावकर्‍यांना रोजच या समस्यांना सामोर जावं लागतं. गावातूनबाहेर पडयाच म्हटलं की नदी पार करण गावकर्‍यांच्या वाट्याला आले आहे. शाळेतील मुलं आपलं दफ्तर डोक्यावर घेऊन,सायकली खाद्यांवर घेऊन नदी पार करावे लागते एवढेच नाही तर वृध्दांना नदीपार करत येणं शक्य नसल्यामुळे त्यांना पाठीवर बसवून नदीपार केली जाते. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली तर जाणे येणे बंदच. कित्येकदा नदीला पूर आला की आजारी व्यक्तींना उपचारासाठी गावाबाहेर हलवता येत नाही, यामुळे अनेकांना जीव गमावावा लागतो. महत्वाचं म्हणजे या मतदारसंघानं राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेत. निवासी जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकाराची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.

close