मनसे विरुद्ध बिहारी

September 1, 2012 4:34 PM0 commentsViews: 11

01 सप्टेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांमधल्या वादाला आता नव्यानं सुरुवात झाली आहे. काल शुक्रवारी राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचार प्रकरणी बिहारमध्ये दंगेखोरांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस गेले असता. बिहारच्या मुख्यसचिवांनी त्यांना मज्जाव केला होता. तसेच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास बिहारींना घुसखोर समजून हाकलून देऊ, असा इशारा राज यांनी दिला. राज यांच्या याविधानावर आक्षेप घेत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग, खासदार संजय निरुपम आणि सपाचे आमदार अबू आझमी यांनी हल्लाबोल केला. या नव्या वादामुळे पुन्हा एकदा मनसे विरुद्ध बिहारी असा सामना रंगला आहे.

ठाकरे हे बिहारचे – दिग्विजय

काँग्रेसच्या सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी थेट वेगळाच तर्क काढला आहे म्हणे, राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे बिहारचे आहे. बिहार येथून ते पुढे धार येथे गेले आणि त्यानंतर ते मुंबईत स्थाईक झाले. मुंबईचे खरे मराठी तर तेथील कोळी समाज हा आहे. राज यांनी सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांच्या विरोधात जे काही विधान केले आहे त्यांनी त्याबद्दल त्यांची माफी मागावी अशी मागणीही दिग्विजय सिंग यांनी केली.

मनसे नक्षलवादी पक्ष म्हणून घोषित करावे – आझमी

लोकांना देशात कुठेही जाण्याचा, राहण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे. राज यांनी परप्रांतीयांना घुसखोर म्हणून नये. जर मुख्यसचिवांनी पत्र पाठवले असेल राज यांनी त्यात ढवळाढवळ करु नये. त्यासाठी राज्य सरकार आहे असा टोला निरुपम यांनी लगावला. तर मनसे या पक्षालाच नक्षलवादी,फुटीरतावादी म्हणून घोषित करावे, ही लोक नक्षलचे पुजारी आहे. जेव्हीही बोलतात नेहमी फुटीरतावादी बोलता. मुख्यसचिवांनी मज्जाव केला असाल तर त्यात गैर काय ? मुंबई पोलिसांना दुसर्‍या राज्यात जायचे असेल तर त्यांनी तसे तेथील सरकारला कळवावे. देश राज्यघटनेनुसार चालतो कोणाच्या गुंडागर्दीने चालत नाही. जर राज यांनी बिहार सरकार विरोधात एवढाच राग असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावे असं आव्हान अबू आझमी यांनी दिलं.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चौकशी करू- गृहमंत्री

तर राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चौकशी करू आणि वक्तव्य आक्षेपार्ह आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

close