मंदीमुळे कोल्हापूरचा फौंड्री उद्योग संकटात

December 11, 2008 5:37 AM0 commentsViews: 8

18 नोव्हेंबर, कोल्हापूरप्रताप नाईकजागतिक मंदीमुळे छोट्या उद्योगांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला फौंड्री उद्योग तर 70 टक्के बंद झालाय. त्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. या उद्योगांवर अवलंबून असणार्‍या 60 हजार कामगारांच्या रोजगारावरही कुर्‍हाड कोसळली आहे.कोल्हापूर शहर आणि परीसरात जवळपास अडीचशे फांैड्री आहेत. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर अडीच हजार कोटींचा टर्नव्होवर आहे.डी. डी. पाटील. गेल्या सात वर्षापासून त्यांचा एमआयडीसी शिरोलीत फौंड्री व्यवसाय आहे. महिन्याला त्यांचा टर्नओव्हर एक कोटी रुपयांचा होता. पण मंदीमुळे आता तो वीस लाखांवर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर फौंड्री व्यावसायिकांची अवस्था अशीच आहे. "बँकेचं व्याज तशीच चालू आहेत,कर्ज असणार आहेत देणी असणार आहेत. बँकेचे व्यवहार थांबले आहेत, लोकांची येणारी पेमेंट्स थांबली आहेत" असं डी. डी पाटील यांनी सांगितलं.सध्या सुरू असलेल्या 30 टक्के उद्योगाना कच्या मालाच्या घटलेल्या किंमतीमुळं मोठा फटका बसतोय.उत्पादीत केलेल्या मालाला चांगला भाव मिळत नसल्यामुळं ते सुद्धा मोठ्या आर्थीक संकटात सापडले आहेत. "गेली चार ते पाच वर्षे मागणी चांगली असल्यानं लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि आता मागणी कमी झाली. त्यामुळे परत अडचणी वाढत चालल्या आहेत" असं स्मॅकचे अध्यक्ष पद्माकर सप्रे यांनी सांगितलं.मंदीच्या फटक्यातून या उद्योगाला सावरण्यासाठी सरकारनं मदत करावी, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. अन्यथा इतकी वर्ष चालू असणारा हा उद्योग बंद होईल आणि कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळेल.

close