देशात कुठेही जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही- शिंदे

September 3, 2012 11:50 AM0 commentsViews: 5

03 सप्टेंबर

राज ठाकरेंच्या बिहारींबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वादाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कोणत्याही नागरीकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कोणी कोणालाही रोखू शकत नाही या शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच मीडियाला धमकी देणं योग्य नसल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. काल रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी चॅनेल आपल्या वक्तव्याचा विपर्यास करतात असा आरोप करत राज्यात हिंदी चॅनेल्स बंद पाडू असा इशारा दिला होता.

close