राज्यसभेत धक्काबुक्की

September 5, 2012 2:40 PM0 commentsViews: 2

04 सप्टेंबर

राज्यसभेत आज पुन्हा एकदा लाजिरवाणा प्रकार घडला. एसएसी आणि एसटीना सरकारी नोकरीत बढतीत आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मांडलं जात असताना समाजवादी पार्टीचे खासदार आणि बसपाच्या खासदरांमध्ये धक्काबुक्की झाली. सपाचे नरेश अग्रवाल आणि बसपाचे अवतारसिंह करमपुरी यांच्यात धक्काबुक्की झाली. या आरक्षणाला समाजवादी पक्षाचा विरोध आहे. तर बसपाचा पाठिंबा आणि त्यावरुनचं या दोघांमध्ये वाद झाला. सकाळी 11 वाजता गदारोळानंतर 12 वाजेपर्यंत राज्यसभेच काम काज तहकूब करण्यात आले होते. दुपारी कामाला सुरुवात झाली. आणि बढतीचे आरक्षण विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला विरोध करत सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांना रोखण्यासाठी बसपाचे अवतार सिंह पुढे सरसावले. मात्र नरेश अग्रवाल यांनी त्यांना धक्का मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. राज्यसभेच्या इतर सदस्यांनी हस्तेक्षप करुन दोघांनीही आवरलं. दरम्यान, नोकरीतल्या बढतीच्या आरक्षणावरुन सपा आणि बसपा यांच्या नेत्यांनी आपले मतं व्यक्त केली.मायावतींनी याच सत्रात बिल पास होण्याची मागणी केली. तर मुलायम सिंह यांनी याला विरोध केला.

close