भारतानं हवाई हद्दीचा भंग केल्याची पाकची तक्रार

December 18, 2008 10:05 AM0 commentsViews: 5

18 डिसेंबरभारताने आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल पाकिस्ताननं अधिकृत निषेध नोंदवला आहे . भ्13 डिसेंबरला भारतीय वायू दलाच्या जेट लढाऊ विमानांनी आमच्या सिमेत घुसखोरी केल्याचा आरोप पाक लष्करानं केला होता.मात्र भारतानं पाकिस्तानचा आरोप फेटाळला आहे.भारतानं हवाई हद्दीचा भंग केल्याचा आरोप करणार पत्र पाकिस्तानचे दक्षिण आशियातले अ‍ॅडिशनल सेक्रेटरी ऐयाज अहमद चौधरी यांनी भारताचे उप उच्चायुक्त मनप्रीत व्होरा यांच्याकडे सोपवले. भारताच्या दोन लढाऊ जेट विमानांनी पाकव्याप्त काश्मीर आणि लाहोरदरम्यानच्या हवाई हद्दीचा भंग केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाचे प्रवक्ते महेश उपासनी यांनी मात्र अशा प्रकारच्या कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी ही तांत्रिक चूक असल्याचं सांगितलं होतं. ही फारशी गंभीर घटना नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र त्यांनी आपल्या भूमिकेपासून घुमजाव केला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध बरेच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांवर युद्धाचे ढग जमा झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. दोन्ही देशांनी मात्र शांततामय मार्गानं हा प्रश्न सोडवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आपल्या भमीवरील दहशतवादी कारवायांवर लगाम घालण्यासाठी पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला आहे. मात्र या मुद्द्यावरून जगाचं लक्ष हटवण्यासठी पाकिस्तानने हा नवीन मुद्दा काढल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

close