बिबट्याचं पिल्लू बघतंय आईची वाट

September 6, 2012 11:53 AM0 commentsViews: 14

06 सप्टेंबर

रत्नागिरीमधल्या लांजा शहरानजीकच्या शिवायल फार्म हाऊसमध्ये बिबट्याचं पिल्लू आढळून आलंय. काल रात्रीपासून हे पिल्लू या फार्म हाऊसमध्ये असून वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी या पिल्लावर प्राथमिक उपचारही केले आहे. शिवालय फार्म मध्ये काल रात्री हे पिल्लू आढळल्यानंतर फार्म हाऊसच्या मालकाने ते आपल्या घरी नेऊन वनविभागाच्या अधिका-यांना तातडीने याबाबत खबर दिली. मात्र त्याची आई याला घेऊन जाईल म्हणून आणखी काही दिवस फार्म हाऊसमध्येच या पिल्लाची जोपासना करण्यात येणार आहे. बिबट्याची मादी जर पिल्लाला घेऊन नाही गेली तर हे पिल्लू वनविभागाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचं समजतंय.

close