दिग्विजय सिंग यांचं डोक फिरलंय – उध्दव ठाकरे

September 6, 2012 12:05 PM0 commentsViews: 6

06 सप्टेंबर

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचं डोक फिरलं आहे. आमचं कुटुंब हे महाराष्ट्रीयन आहे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी जे पुस्तकात लिहले होते ते त्या समाजासाठी लिहले आहे. माझं कुटुंब कुठून कुठे आले याबद्दल तसं काहीही नाही. त्यांना फक्त व्होट बँक मजबूत करण्यासाठी वाद घालत आहे अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली. काल मंगळवारी ठाकरे कुटुंब हे मुळचं बिहारचं असल्याचा दावा दिग्विजय सिंग यांनी केला होता. आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा हवाला घेऊन आपण हा दावा केला होता असं समर्थन त्यांनी केलं होतं. पण शिवेसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय.

close