सचिनमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक -गांगुली

September 7, 2012 5:12 PM0 commentsViews: 29

07 सप्टेंबर

भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने आज सचिनची जोरदार पाठराखण केली. सचिनसोबत मी सर्वाधिक क्रिकेट खेळलोय, आणि म्हणून याच अनुभवातून सांगतो की सचिनमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. येणार्‍या काळात त्याने टेस्ट क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रीत करावे असा सल्लाही गांगुलीने सचिनला दिला आहे. क्रिकेटर दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात गांगुलीने क्रिकेटवरील आपली बिनधास्त मतं व्यक्त केली. अजित वाडेकर, बापू नाडकर्णी, दिलिप वेंगसरकर यांच्यासह क्रिकेटक्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. दिलीप सरदेसाई यांच्या क्रिकेटमधील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

close