भारतीय क्रिकेट टीमचा पाक दौरा रद्द

December 18, 2008 1:01 PM0 commentsViews: 6

18 डिसेंबर, नवी दिल्लीभारतीय क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा रद्द झाला आहे. लोकसभेच्या सभागृहात क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी आज भारताचा पाक दौरा रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली. जानेवारीत भारतीय टीमचा हा दौरा होणार होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानाचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. हल्ला करणारे अतिरेकी ही पाकिस्तानचे असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. पण पाकिस्तान काहीही मानण्यास नकार दिलाय. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट टीमचा पाक दौरा होतो की नाही, यावर शंका व्यक्त होती. या सर्व पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी बीसीसीआयला दौरा रद्द करत असल्याचं कळवलं. सध्याच्या परिस्थितीत पाक दौरा होऊ शकत नाही, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय.पाक दौरा रद्द झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी म्हणाले, पाक दौर्‍याच्या वेळापत्रकात कुठलेही आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचे निश्चित केलेले नाही. दौरा रद्द करण्याचा अधिकार केंद्रानं घेतला असून बीसीसीआयची त्यात कोणतीही भूमिका नाही. भारत-पाक सामने इतरत्र खेळवण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही.'

close