‘चिल्लर’ पार्टी प्रकरण दुर्देवी – अजित पवार

September 8, 2012 3:45 PM0 commentsViews: 3

08 सप्टेंबर

पुण्यात झालेलं दारू पार्टी प्रकरण दुर्देवी आहे. याप्रकरणी आपण आपल्या भावावरही गुन्हा दाखल करायला लावला. पुण्यासारख्या सांस्कृतीक शहरात असा प्रकार घडणे दुर्देव आहे अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पुण्यात आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुण्याचे खासदार, आमदार, महापौर, शासकीय अधिकारी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला कॉमनवेल्थ घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच खासदार सुरेश कलमाडी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका व्यासपीठावर हजर होते. गणेत्सोवात गणेश मंडळांना 5 दिवस लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं.

close