एक था टायगर !

September 10, 2012 1:33 PM0 commentsViews: 22

आरती कुलकर्णी, मुंबई

10 सप्टेंबर

मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये लायन सफारी आणि टायगर सफारीपेक्षाही सध्या एक मोठं आकर्षण आहे. कारण इथे एका व्हीआयपी वाघाला आणण्यात आलं आहे.सैबेरियन टायगर ! रशिया, चीन आणि उत्तर कोरियाच्या बर्फाळ प्रदेशातला महाराजा.. जगभरामध्ये हे वाघ सुमारे 600 च्या संख्येने उरलेत. पण यातलाच एक वाघ सध्या बघायला मिळतोय बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये ! नैनितालच्या प्राणीसंग्रहालयात 22 वर्षं दिमाखात वावरणारा हा वाघ मरण पावल्यानंतर त्याला इथे आणण्यात आलं. आणि टॅक्सीडर्मीचे तज्ज्ञ डॉ. संतोष गायकवाड यांनी त्याला त्याचं रुबाबदार रूप पुन्हा मिळवून दिलं.

डॉ. संतोष गायकवाड यांनी याआधी रॉयल बेंगॉल टायगर म्हणजेच भारतात आढळणार्‍या वाघाचाही असा पुतळा बनवला. हे तंत्र विकसित करणारे ते भारतातले एकमेव तज्ज्ञ आहेत. या वाघाला आता पुन्हा विमानाने नैनितालला पाठवण्यात येणार आहे. पण त्याआधी काही दिवस हा दुर्मिळ सैबेरियन टायगर तुम्हाला बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळेल.

close