एका व्यंगचित्रकाराला ‘कोठडी’

September 10, 2012 5:42 PM0 commentsViews: 2

10 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्याने काढलेल्या व्यंगचित्रांमुळे.. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून.. त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. पण देशद्रोहाचा गुन्हा रद्द होत नाही, तोवर जामिनासाठी अर्ज करणार नाही, असं त्याने ठरवलंय. त्यामुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला.

ही निदर्शनं होती तरूण व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीच्या अटकेचा निषेध करणारी. मुंबईत इंडिया अगेन्स्ट करप्शनची निदर्शनं सुरू होती.. तर असीमचं घर असलेल्या कानपूरमध्ये त्याच्या समर्थनासाठी मोठी रॅली काढण्यात आली.पण हे सगळं सुरू असताना.. असीम त्रिवेदीला कोर्टात हजर करण्यात आलं. गृहमंत्री आर आर पाटील यांनी आधी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली नाही. कोर्टाने असीमला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. असीमला जामीन मिळू शकतो. पण जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी अशी भूमिका असीमने घेतली.

असीमविरुद्ध लावलेला देशद्रोहाचा गुन्हा तर रद्द व्हावाच.. पण त्यासोबत हे कलमच भारतीय दंड विधानातून वगळावं अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनने केली.

भ्रष्टाचाराविरोधात असीमने काढलेल्या या व्यंगचित्रांमुळे त्यांच्याविरोधात अमित कटारनया नावाच्या वकिलाने तक्रार दाखल केली होती. गोंधळलेलं राज्य सरकारही या तक्रारदाराशी काही प्रमाणात सहमत असल्याचं दिसतंय..

ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेला हा कायदा अनेकदा विरोध दडपण्यासाठी वापरला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात जाणारा हा कायदाच रद्दच करावा, अशी मागणी आता हळुहळू जोर धरतेय.

close