इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आचारसंहिता लागू

December 18, 2008 12:52 PM0 commentsViews: 12

18 डिसेंबर, नवी दिल्लीमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मीडियासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नॅशनल ब्रॉडकास्टिग असोसिएशननं दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद घेतली. यात ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली. ही आचारसंहिता सरकारनं घातलेली नाही तर नॅशनल ब्रॉडकास्टिग असोसिएशननं स्वत:हून घालून घेतलीय. एनबीएमध्ये देशातल्या सर्व टीव्ही चॅनल्सचे प्रतिनिधी हे या असोसिएशनचे पदाधिकारी आहेत.एनबीएचे चेअरमन जस्टीस जे. एस.वर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ' दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांचा हेतू साध्य होईल, अशा बातम्यांचं थेट प्रक्षेपण टाळलं पाहिजे. अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्यांची माहिती बातम्यांमध्ये सांगू नये. मदत पथक ओलिसांची सुटका करत असेल तर किती पोलीस दल, त्यांच्या मोहिमेची माहिती देता कामा नये. घटना घडत असताना त्यातून बचावलेले नागरिक तसंच सुरक्षा पथकांशी थेट संवाद टाळावा. हे न करणार्‍या प्रसारमाध्यमांना दंड ठोठावण्याची तसंच लायसन्स रद्द करण्याची तरतूद आहे. मीडियांचं काम महिती देणं आहे पण चुकीची महिती नाही. याशिवाय वारंवारं दाखवण्यात येणार्‍या दृश्यामुळे प्रेक्षकांचं मन विचलित होतं. त्यामुळे वारंवारं दाखवण्यात येणार्‍या फुटेजवर ' फाईल ' असावं तसंच शक्य असल्यास तारीख आणि वेळ तिथे देण्यात यावी. याबद्दल कोणीही तक्रार न केल्यास अ‍ॅथॉरिटीकडे याबाबतची दखल घेण्याचे अधिकार आहेत ', असं न्यायमूर्ती शर्मा म्हणाले.

close