महिलांच्या पुढाकारतून तांड्यावर दारुबंदी

September 10, 2012 4:41 PM0 commentsViews: 32

प्रवीण सपकाळ, सोलापूर

10 सप्टेंबर

सोलापूर जिल्ह्यातल्या दुधनी परिसरातल्या बंजारा समाजाने दारुबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तांड्यावर होणारी दारूची विक्री बंद केली. दारू पिणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्याचा एकमुखी निर्णयही घेतला.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेलं दुधनी हे एक प्रमुख गाव…शेजारच्या कर्नाटक राज्यातून दारूची खुलेआम वाहतूक होते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालतात. याचा परिणाम इथल्या समाजजीवनावर झाला आहे. युवा पिढी दारुच्या आहारी जातेय. व्यसनाच्या आहारी जाणारी तरूण पिढी वाचवायला हवी. यासाठी इथल्या महिलांनीच पुढाकार घेतला. समाजातील पंचांसमोर हा विषय मांडत दारुबंदीचा निर्णय मान्य करुन घेतला. दारू विकणार्‍यावर आणि पिणार्‍यावर तांड्याचे प्रमुख आणि महिलांचंही लक्ष असणार आहे. बंजारा समाजाने स्वयंस्फूर्तीनं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होतंय.

close