मायलेकाची झाली पुन्हा भेट

September 11, 2012 4:48 PM0 commentsViews: 10

प्राची कुलकर्णी, पुणे

11 सप्टेंबर

मुंबईमधल्या सीएसटी रेल्वे स्टेशनवरुन संगीता पवार या लहानग्या मुलीला पळवलं गेलं जी नंतर वाराणसीला सापडली. पुण्यामध्येही मुलांना पळवणारी रॅकट कार्यरत आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर बस स्थानकावरुन अडीच वर्षांचा लहानगा अबीर काल हरवला. पण 24 तासांच्या आतच ताटातुट झालेल्या मायलेकांची भेट झाली.

24 तासांपुर्वी ताटातुट झालेली ही मायलेकरं… आपलं हरवलेलं मुल सुखरुप असल्याचं पाहुन अबीरच्या आईला अश्रू आवरता येत नव्हते. मायलेकांची ही भेट पाहुन सगळ्यांचेच डोळे पाणावले. सोमवारी शिवाजी नगर बस स्टँडवरून अबीर गायब झाला होता. अबीरची शोधाशोध सुरु झाली..पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांच्या बरोबरीनं अबीरचे सगळे नातेवाईक रात्रभर अबीरचा शोध घेत होते. पण अबीरबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती.

हा शोध सुरु असतानाच आज सकाळी… एक महिला मुलाच्या तोंडाला स्कार्फ बांधून त्याला घेऊन जात होती. त्यानंतर लोकांच्या मदतीने अखेर त्या महिलेला पकडण्यात आलं. आणि अबीरची सुटका झाली.

काही दिवसांपुर्वीच ससुन हॉस्पिटल आणि हडपसरमधल्या साने गुरुजी हॉस्पिटल मधून बाळाला पळवण्याच्या घटना घडल्या होत्या ज्यांचा शोध अजुनही लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुलं पळवण्याचं कुठलं रॅकेट पुण्यामध्ये सक्रीय झालं आहे का याचा शोध पोलिस घेत आहे.

close