स्फटिकातून साकारली गणेशमूर्ती

September 15, 2012 2:55 PM0 commentsViews: 43

15 सप्टेंबर

सध्या सगळीकडं गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अगदी मातीपासून ते कडधान्यांपर्यत कशातूनही गणेशमूर्ती साकारली जाते. पण कोल्हापुरातल्या डॉ. बी. एस. मोहिते यांनी नैसर्गिक स्फटिकांपासून जगातली पहिली गणेशमूर्ती तयार केली आहे.

शिवाजी विद्यापीठातल्या रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बी. एस. मोहिते..त्यांनी जगातलं पहिलं गणेश मंदिर तयार केलंय तेही स्फटिकांपासून…गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी स्फ्‌टकं बनवण्याचा छंद जोपासलाय. ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा खडक, खनिजे आणि इतर घटक वितळून लाव्हारस तयार होतो. तो लाव्हारस थंड होत असताना पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीत सुंदर अशी स्फटीकं तयार होतात. याच स्फटीकांपासून डॉ. मोहिते यांनी 50 हून अधिक स्फटीक शिल्प तयार केली.

डॉ. मोहितेंसोबत काम करणार्‍या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळत आहे. ही स्फटीक शिल्प वैज्ञानिक दृष्टीकोनातून उपयुक्त असल्याचं त्यांचे विद्यार्थी सांगतात.

डॉ. मोहितेंच्या या आगळ्यावेगळ्या छंदामधून त्यांनी विविधरंगी स्फटिकं तयार केलीत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या प्रचंड मागणीमुळे ही कला सर्वांपर्यंत पोहचवण्याचा डॉ. मोहिते यांचा मानस आहे.

close