गडकरींनी केला विलासरावांवर भ्रष्टाचाराचा आरोप

December 18, 2008 9:42 AM0 commentsViews: 3

18 डिसेंबर,नागपूर मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, त्याच दिवशी विलासराव देशमुख मात्र दोन हजार कोटी रुपये खर्चाचं रस्त्याचं टेंडर काढण्यात गुंतले होते, असं भाजप नेते नितीन गडकरी यांनी विधानपरिषदेत केलेल्या आरोपावरुन दिसतंय. मुंबईच्या सायन- पनवेल रस्त्यांचं टेंडर 24 तासाच्या आत काढा,असा आदेश विलासराव देशमुखांनी दिला. हा आदेश 26 नोव्हेंबरला दिल्याचं गडकरी यांनी मिडियाला दिलेल्या कागदपत्रावरुन दिसतंय. टेंडरसाठी ज्या अटी लावण्यात आल्या त्या इंडिया बुल या कंपनीला धार्जिण्या आहेत. या कंपनीशी विलासराव आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या मुलाचे हितसंबंध आहेत, असा आरोपही गडकरी यांनी केलाय. ' विलासरावांनी मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना टाळून हा निर्णय घेतला. 26 नोव्हेंबरला रात्री निर्णय घेण्यात आला.27 नोव्हेंबरला सकाळी वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या ', असं गडकरी यांनी पत्रकारांना सांगितलं.

close