लोकं कोळसा घोटाळाही विसरतील – शिंदे

September 15, 2012 5:54 PM0 commentsViews: 5

15 सप्टेंबर

देशात आजवर झालेल्या घोटाळ्यातला सर्वात मोठा घोटाळा म्हणजे कोळसा घोटाळा..तब्बल 1 लाख 86 हजार कोटींचा हा घोटाळा म्हणजे जनतेचा विश्वासघात..पण देशाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात,जनता विसरभोळी असते काही दिवसांनी ती सगळं काही विसरते एवढा मोठा बोफोर्स घोटाळा होता शेवटी विसरलो ना आपण..तसंच कोळशाचं आहे…कोळशात हात काळे झाले म्हणे…पण हात धुतले की स्वच्छ परत… अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेच्या जखमेवर जणू मीठ चोळलंय.

close