अकोला महापालिकेत युतीच्या नगरसेवकांचा राडा

September 17, 2012 4:31 PM0 commentsViews: 4

17 सप्टेंबर

अकोला महापालिकेत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी आज तोडफोड केली. वाहन घोटाळ्यावरून नगरसेवक आक्रमक झाले. वाहनं वापरण्यात येत नसताना वाहनाची बिलं काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. या घोटाळ्यातल्या दोषींवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करत सेना, भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यांनी आयुक्तांना घेरावही घातला.

close