मुंबईत भरलंय ऐतिहासिक नकाशाचं प्रदर्शन

December 18, 2008 10:30 AM0 commentsViews: 5

18 डिसेंबरशिल्पा गाड जुन्या काळातले नकाशे नेहमीच आकर्षण ठरतात. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयात सध्या रोमन काळातल्या भारताच्या नकाशाचं प्रदर्शन भरलंय. सोळाव्या ते एकोणीस शतकातले नकाशे प्रदर्शनात आहे. नकाशे हे केवळ भौगोलिक ठिकाणंच दर्शवत नव्हते तर त्या त्या भागात कोणाची सत्ता आहे हे ही. आज गुगल सर्चला जे महत्त्व आहे ते पूर्वी या नकाशांना होतं. कारण तेव्हा सगळी माहिती नकाशातूनच मिळायची. ' पूर्वीच्या काळी व्यापार्‍याच्यादृष्टीनं नकाशाचं महत्त्व खूप होतं. नकाशे एकमेकांत वाटले जात नसे. ते अगदी तंतोतत नव्हते पण चुकीचेही नव्हते', असं छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयाचे डायरेक्टर सब्यासाची मुखर्जी यांनी सांगितलं.प्रदर्शनातील काही नकाशे 300 वर्ष जुने आहेत. या नकाशांचा कागद हा कॉटन बेस म्हणजे कापडाचा जास्त वापर करुन बनत असे .त्यामुळे त्यांचा टिकावूपणा वाढत असला तरीही त्यांची काळजी घ्यावीच लागते.' या नकाशांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना जास्त सूर्यप्रकाश लागता कामा नये. कागद असल्यामुळे तो फाटण्याची शक्यता असते ', असं क्युरेटर फिरोजा गोदरेज म्हणाले. नकाशे केवळ मार्गदर्शनच नाही करत नाहीत, तर त्या काळाचा इतिहासच उलगडुन दाखवतात. तेव्हा इतिहासात डोकावण्याची ही संधी गमावू नका.

close