56 वर्षांनंतर कर्मवीरांची शेव्हर्लेट पुन्हा धावली

September 22, 2012 2:52 PM0 commentsViews: 62

22 सप्टेंबर

56 वर्षांपासून बंद असलेली कर्मवीर भाऊराव पाटील यांची शेव्हर्लेट गाडी आज पुन्हा धावली. सातार्‍यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून अण्णांची शेव्हर्लेट गाडी दुरुस्त करण्यात आली होती. 1948 मध्ये रयत शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी भाऊराव पाटलांना ही शेव्हर्लेट गाडी भेट दिली होती. शिक्षणाच्या प्रसारासाठी भाऊराव पाटील ठिकठिकाणी जाण्यासाठी या गाडीचा वापर करीत असत. 1956 मध्ये अण्णा आजारी पडल्यानंतर या गाडीची चाकंही थांबली होती. सकाळी 8 वाजता अण्णांच्या समाधी स्थळावरून रॅलीला सुरवात झाली. आणि या रॅलीत ही शेव्हर्लेट गाडीही धावली.

close