अंतुलेंच्या राजीनाम्यावर काँग्रेसची बैठक

December 19, 2008 5:32 AM0 commentsViews: 1

19 डिसेंबर, नवी दिल्लीअंतुलेंच्या राजीनाम्यावर चर्चेसाठी काँग्रेस कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. अंतुलेंनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवून दिला होता. त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई करावी, यासाठी हे या बैठकीत ठरणार आहे. राज्यसभेतल्या काँग्रेसचे काही नेते तसंच युपीएतल्या काही घटक पक्षांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं काँग्रेसला कठीण बनलं आहे.' केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा मी दिलाय हे ठामपणे सांगू तसंच नाकारु ही शकत नाही. मला राजीनामा देण्यास कोणीही सांगितलेलं नाही. करकरेंच्या मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी चुकीचं काही बोलेलो नाही. करकरे आणि त्याचे दोन सहकारी पाक अतिरेक्यांच्या हातून मारले गेले. माझा प्रश्न एवढाच आहे की ते कामा हॉस्पिटलच्या दिशेनं का गेले ? अतिरेक्यांच्या हाती त्यांना कोणी सोपवलं. अनेक भारतीयांच्या मनात असलेला प्रश्न मी बोलून दाखवला आहे ', असं अंतुले म्हणाले. लोकसभेत हेमंत करकरेंच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानानंतर अंतुले वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

close