गणेश निधी :स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी तरुणांचा ‘आधार’

September 22, 2012 11:50 AM0 commentsViews: 377

सचिन राजगोळकर, कोल्हापूर

22 सप्टेंबर

दिवसेंदिवस स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. समाजाची मानसिकता आणि कायद्याच्या पळवाटा यामुळे स्री भ्रूण हत्या रोखण्यात अडचणी येत आहे. असं चित्र असतानाही त्यामध्ये बदल करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांची एक संस्था काम करतेय.

आज महाराष्ट्राचा विचार करता दररोज 107 मुली जन्माला येण्याआगोदर मारल्या जातात. दररोज 107 मुलींचा जन्म नाकाराला जातो. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रानं 4 लाख 68 हजार 80 मुलींना जन्माला येवु दिलेलं नाही अशी व्यथा मांडतोय आधार बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थाचे तरुण अध्यक्ष शिवाजी माळी..

महाराष्ट्रातील स्त्री भ्रूण हत्येतलं विदारक चित्र स्पष्ट करणारा हा आहे हेरवाडचा शिवाजी माळी. स्री भ्रूण हत्येतलं विदारक चित्र बदलावं यासाठी तो तरुण सहकार्‍यांसोबत गेल्या पाच वर्षापासून काम करतोय.

शिवाजी माळी म्हणतो, आधार बहुउद्देश स्वयंसेवी संस्था.या संस्थेची स्थापना 18 जून 2007 रोजी झाली. संस्थेचा मुख्य उद्देश महिलांच्या अनेक प्रश्नावर काम करणे असा आहे.

शिवाजीसोबत एम.एस.डब्लुचं शिक्षण घेतलेली ज्योतीही 'आधार'संस्थेत काम करत आहे. स्त्री भ्रूण हत्येवर काम करताना आम्ही प्रामुख्यानं पथ नाट्याचे प्रयोग सादर करणे. मुलींच्या जन्माचं स्वागत करणे हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. त्या अंतर्गत कन्यारत्न प्राप्त आई वडीलाचं त्याच्या घरी जावुन सन्मान पत्र आणि झाडं देवून त्याचं सत्कार करतो.जेणेकरुन त्या पालकांना मुलगी जन्माला घातल्याबद्दल समाधान वाटावं.

लहानमुलं… तरुण आणि वस्त्या-वस्त्यात जाऊन पथनाट्य सादर करतात.त्यात शेतकरी, नोकरदार विद्यार्थी सहभागी होतात. कायद्याचा अभ्यास करताना आम्हाला असं लक्षात आलं. की अनेक डॉक्टर मुलींचा जन्म नाकारण्याचा बेकायदेशीर कामात गुंतलेले आहेत. याला आळा घालण्यासाठी आम्ही कायद्याचा बडगा उगारला अशा मुलीचं जन्म नाकारणार्‍या 10 वैद्यकीय अधिकार्‍यांना रंगेहात पकडलं आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आधारची सदस्या ज्योती भालकर म्हणतात, त्या डॉक्टरांना जी फी द्यायची असेल ती आमच्या पगारातून देत आलोय. त्या केसेस यशस्वी केल्यात. केस यशस्वी केल्यानंतर अनेकवेळा जिवे मारण्याचा धमक्या आल्यात. कोर्टापर्यंत ह्या केसेसचा निर्णय घेईपर्यंत मला असतील शिवाजीला असतील धमक्या आल्यात.

जनजागृतीपासून कायदेशीर लढाईपर्यंत आधारचं काम आता कोल्हापूरमधल्या अनेक तालुक्यांमध्ये पोहचतंय.

कोल्हापूरच्या आधार संस्थेला तुम्हीही मदत करु शकता. ही मदत वस्तू किंवा आर्थिक स्वरुपात तुम्ही करु शकता… आधार स्वयंसेवी संस्थापत्ता – शिवाजी बाबूराव माळीमुक्काम पोस्ट- हेरवाडतालुका- शिरोळाकोल्हापूर – 416106फोन नंबर- 09922539291

close